भारतीय संस्कृतीचे भान ठेवा! तुळजाभवानी मंदिरात यापुढे ड्रेसकोड, असभ्य कपडे घातल्यास प्रवेश नाही

तुळजापूर: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये यापुढे ड्रेसकोडशिवाय प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. या मंदिरामध्ये वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. तुळजापूर मंदिरामध्ये तोडके कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी केली आहे. मंदिरात असभ्य कपडे घातल्यास वस्त्र घातल्यास मंदिरात प्रवेश दिल्या जाणार नाहीत. यासंदर्भात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फलक लावण्यात आले आहेत.

 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार तुम्ही करत असाल तर मग मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा सल्ला देखील फलकावरून देण्यात आला आहे.

 

तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेले अशा भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

18 मे रोजी मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावण्यात आले आहेत. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाने सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक उपस्थित होते.

केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम
मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट प्ॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाहीड आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!