नाशिक (प्रतिनिधी):– 28 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. या महिन्यात नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन तयारीला लागलं आहे. श्रावण महिन्यात हजारो भाविक त्रंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मारण्यासाठी येत असतात.गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भाविकांना प्रदक्षिणेस बंदी घालण्यात आली होती.त्यामुळे या वर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या भाविकांच्या सोयीासाठी प्रशासनाकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी जवळपास 300 जादा बसेसच नियोजन करण्यात आले आहे.1 ऑगस्टला पहिला सोमवार आहे.8 ऑगस्टला दुसरा सोमवार आहे.तर तिसरा सोमवार हा 15 ऑगस्टला आहे.गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे भाविकांना प्रदक्षिणा मारता आली नाही.त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात भाविक प्रदक्षिणेसाठी दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं पूर्व तयारी केली असल्याची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली.
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग हा जवळपास 20 किलोमीटरचा मार्ग आहे.या मार्गात फार अडथळे नाहीत. भाविकांना चालण्यासाठी चांगला मार्ग आहे.अनेक भाविक प्रदशिक्षाच्या दरम्यान पादत्राणे घालत नाही यापूर्वी प्रदक्षिणा मार्ग हा अवघड होता मात्र आता रस्ते बनवले गेल्यामुळे जास्त त्रास होत नाही.मात्र मार्गात भाविकांना जर वैद्यकीय मदतीची गरज पडली तर,त्यांना तात्काळ मदत मिळावी या करिता पहीने, सामुंडी सापगाव या मार्गावर वैद्यकीय पथक असणार आहेत.तीन सुसज्ज अशा रुग्णवाहिका देखील मदतीसाठी तयार आहेत.

नाशिककडून जाणार्या खाजगी वाहनांसाठी खंबाळे येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे तर, गिरणारे मार्गे येणार्या वाहनांसाठी तळवाडे येथे पार्किंग करण्यात आली आहे. जव्हार मार्गे येणार्या वाहनांसाठी पिंपळद जवळ पार्किंग व्यवस्था केली गेली आहे.घोटी मार्गे येणार्या वाहनांना सामुंडी जवळ पार्किंग व्यवस्था केली गेली आहे.फक्त महामंडळाच्या सरकारी बस या जव्हारफाटा बसस्थानका पर्यंत जाऊ शकतील,खाजगी वाहनातून आलेल्या भाविकांना आपली वाहन पार्क करून बसचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने येणार्या भाविकांच्या दर्शनाची चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली आहे.दर्शनरांगेसाठी भव्य असा मंडप नुकताच गेल्या काही दिवसांपापूर्वी उभारण्यात आला आहे.श्रावण महिन्यात आलेल्या सर्व भाविकांना दर्शन मिळण्यासाठी त्रंबकराजांचे मंदिर हे पहाटे 4 ते रात्री 9 वाजे पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.तर संत निवृत्तीनाथ महाराजांचे मंदिर देखील याच वेळेत खुले राहील.