चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणार्‍या वाहनधारकांनो सावधान!

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा): अंतर्गत रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणार्‍यांना मोठा दंड भरावा लागेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

एका कार्यक्रमात त्यांनी केलेली घोषणा ऐकून कार, बाईक आणि अन्य वाहनधारकांना मोठा धक्का बसला आहे. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र कोणी पाठवल्यास त्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल.हा कायदा लवकरात लवकर आणण्याचा सरकार विचार करीत असल्याचे ही गडकरी यावेळी म्हणाले.

गडकरी यांनी घोषणा केल्यानंतर वाहन चालवणार्‍यांकडून या नियमावर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. काही लोक याला सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत म्हणत आहेत. जो व्यक्ती आपले वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क करेल त्याला यासाठी 1000 रुपये दंड भरावा लागेल. केंद्राने असा कायदा आणल्यानंतर रस्त्यावरील वाहतूककोंडी आणि अपघात कमी होतील, अशी या मागची कल्पना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!