सावधान! कर्जाच्या हप्त्यात पुन्हा होणार वाढ

नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा):- सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. मे महिन्यात रेपो दरात अनपेक्षित 40-बेसिस पॉईंट्स आणि जूनमध्ये 50 बेसिस पॉइंट्स वाढ केल्यानंतर आरबीआयने केलेली ही तिसरी वाढ आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने आपल्या घर आणि कार कर्जासारख्या इतर कर्जाच्या ईएमआयमध्ये वाढ होईल.

जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत रेपो दरात ही सलग तिसरी वाढ आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑगस्टमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर आज रेपो दरात वाढ केल्याची माहिती दिली. चलनवाढ दशकभराच्या उच्चांकावर आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे.

जगातील इतर मध्यवर्ती बँकांनी दर वाढवल्यामुळे आरबीआयने मे महिन्यात दर वाढवण्यास सुरुवात केली. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे आणि जूनमध्ये धोरणात्मक दरात एकूण 0.90 टक्क्यांनी वाढ केली.

रेपो रेट म्हणजे ज्यावर व्यापारी बँकांना कर्ज देते. त्याला रिप्रोडक्शन रेट म्हणतात. म्हणजेच संक्षिप्तमध्ये त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट कमी म्हणजे बँकेकडून सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील. म्हणजेच कमी रेपो रेटमुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज हे सर्व स्वस्त होते. पण, यामुळे तुमच्या ठेवीवरील व्याजदरही वाढतो. त्याचप्रमाणे त्याच्या वाढीमुळे सर्व प्रकारची कर्जे महाग होतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!