मुंबई : भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने सोमवारी (दि. 28) इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी दिली आहे. इन्कोव्हॅक ही नाकावाटे (सुईशिवाय) दिली जाणारी जगामधील पहिली कोविड लस तयार करण्यात आली आहे. इंग्रजीमध्ये या लशीला Intra-Nasal Covid Vaccine असे म्हटले जाते.
कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगितले आहे की, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रित वापरासाठी असलेल्या सर्व प्रौढांसाठी या लशीचे दोन्ही डोस प्रायमरी सीरिज आणि हेट्रोलगससाठी मंजुरी दिली आहे. याचा अर्थ भारतामध्ये 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत या लशीचा डोस दिला जाऊ शकतो.

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, स्टोरेज आणि वितरणासाठी iNCOVACC दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवता येते. नाकावाटे दिली जाणारी ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनुसार खास डिझाइन आणि विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेमधील सेंट लुईस, मिसूरी येथील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या भागीदारीत ही लस विकसित करण्यात आली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लशीची तीन टप्प्यांत क्लिनिकल चाचणी केली आहे. तसेच, ही लस घेणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. तसेच, यशस्वी परिणामांनंतर ही लस नाकावाटे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. निवेदनानुसार, या लशीच्या प्रोडक्ट डेवलपमेंट आणि क्लिनिकल ट्रायलसाठी अंशतः भारत सरकारकडून निधी देण्यात आला होता.
https://twitter.com/BharatBiotech/status/1597213842077286400?s=20&t=xGMFoIMsibJH6igdV-8qIQ