नाशिकमध्ये भरधाव इनोव्हा कार पलटी; “इतके” जण ठार

नाशिक (प्रतिनिधी) : कारवरील ताबा सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची घटना वाढोली फाट्याजवळ घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शरद रामदास बोडके (वय ३१, रा. आशेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हा एमएच ०५ झेड ०९०९ या क्रमांकाची टोयोटा कंपनी इनोव्हा कार नाशिकहून त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने भरधाव वेगाने घेऊन जात होता. त्यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार अंजनेरी शिवारात वाढोली फाट्याजवळ नाणी संग्रहालयाजवळ पलटी झाली.

या अपघातात कारमधील नवनाथ निवृत्ती नागरे, गोकुळ पोपट घुगे, योगेश विष्णू घुगे, अरुण पोपट गामणे, संदीप ज्ञानेश्‍वर नागरे, माणिक शंकर नागरे, राहुल बाळू घुगे (सर्व रा. पिंपळगाव बहुला, ता. जि. नाशिक) हे गंभीर जखमी झाले असून, कारचालक शरद बोडके हा मृत झाला आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार आर. पी. मुळाणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!