मोठी बातमी! राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली “ही” इच्छा; भगत सिंह कोश्यारी म्हणाले…

मुंबई : भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन दूर करावे, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभरात विरोधकांनी रान उठवले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी विरोधकांनी राज्यपालांची मागणी केली होती. त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामधून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतित करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत दिली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामधून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यामधील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यामध्ये आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे कोश्यारी यांनी सांगितले आहे.

माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!