मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संचालक मंडळ काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आलं होतं.. भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला होती. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार होते. यानंतर आता याजागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. याजागी आता भाजपच्या रामदास तडस यांची वर्णी लागणार आहे.

अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी धवलसिंह मोहिते पाटील आणि काका पवार यांनी अध्यक्ष पदाचासाठीचा अर्ज घेतला मागे आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला रामदास तडस यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळणार आहे.