नवी दिल्ली :- भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने तातडीने हालचाली सुरू करून मोठा निर्णय घेतला आहे.

18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. 15 जुलैपासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे.
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेता येणार आहे. त्यासाठी ते जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात.

सध्या भारतात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 पेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बुस्टर डोस दिला जात आहे. तर 18-59 वयोगटातील नागरिकांसाठी खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिले जात आहेत. ज्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागत आहेत. पण आता या वयोगटातील नागरिकांनाही बुस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1547153650807885824?s=20&t=gL9EN_KLgoBlLhsIx236jg