नाशिक (प्रतिनिधी) :- मोबाईल गेमच्या वेडापायी गळफास घेऊन नऊ वर्षीय बालकाने आत्महत्या केल्याची घटना पंचवटीत घडली.

या नऊ वर्षीय बालकाला मोबाईलवरील गेम खेळण्याची सवय होती. मोबाईल गेमच्या वेडापायी त्याने 15 मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरातील सिलिंग फॅनला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत मृत बालकाच्या आइर्ने ही माहिती पंचवटी पोलीस ठाण्यास कळविली.

त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घिसाडी करीत आहेत.र