नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात महामार्गांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. यात त्यांनी युवक महिला आणि शेतकरी यांच्या बाबत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये PM गतीशक्ति मास्टर प्लान 2022-23 या विषयी माहिती दिली. या मास्टर प्लॅनमुळे लोकांना जलद प्रवास करता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सीतारमण यांनी सांगितले की, एक्सप्रेसवेसाठी पीएम गती शक्ती मास्टर प्लॅन 2022-23 तयार केला जाईल. त्यांनी सांगितले की , 2022-23 मध्ये राष्ट्रीय महामार्गांचा 25,000 किलोमीटरपर्यंत विस्तार केला जाणार आहे. जनतेच्या सोई-सुविधांसाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नॅशनल मास्टर प्लॅन अंतर्गतबंदरे, उडान, आर्थिक क्षेत्र आणि रेल्वे वाहतूक सुविधांच्या बाबतीत एकमेकांशी जोडले जातील. तसेच स्थानिक व्यवसाय आणि पुरवठा साखळींना मदत करण्यासाठी ‘वन स्टेशन-वन प्रॉडक्ट’ संकल्पना राबवली जाईल.