Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?; जाणून घ्या, सविस्तर बातमीतून

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.परंतु या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत असतो. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय मिळाले, काय स्वस्त झाले आणि काय महागले याची चर्चा होत असते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झाले, काय महाग झाले हे खालीलप्रमाणे जाणून घेता येईल.

या वस्तू होणार स्वस्त

चामड्याच्या वस्तू, कपडे, कृषी साहित्य, पॅकेजिंग बॉक्स, मोबाईल फोन चार्जर, रत्ने आणि दागिने स्वस्त होणार आहेत. रत्ने आणि दागिन्यांवरचे कस्टम ड्युटी 5 टक्के करण्यात आली आहे. तसेच कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील कस्टम ड्युटीही 5 टक्के करण्यात आली आहे. तर MSME ना आधार देण्यासाठी स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्युटी सूट एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. तसेच तेलावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली असून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाईल फोन चार्जर, ट्रान्सफॉर्मर इत्यादींवर कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्यात आली आहे.

या वस्तू महागणार

या अर्थसंकल्पात आयात शुल्कातून सूट काढून भांडवली वस्तूंवर 7.5 टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. तर इमिटेशन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे जेणेकरून त्याची आयात कमी करता येईल. तसेच परदेशी छत्रीही महागणार आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!