नाशिक (प्रतिनिधी) :- फरसाणच्या दुकानाचे शटर कोणत्या तरी हत्याराने उचकाटून दुकानातील 1 लाख 20 हजारांची रोख रक्कम दुकान फोडून चोरून नेल्याची घटना जुने नाशिक परिसरात घडली.

फिर्यादी भास्कर आनंदा झोंबाड (वय 42, रा. कोळी वाडा, अंबड गाव, नाशिक) यांचे जुने नाशिकमध्ये न्यू भारत फूड प्रॉडक्ट दुकान आहे. या दुकानाचे शटर अज्ञात दोन इसमांनी पहाटेच्या सुमारास कोणत्या तरी हत्याराने उचकाटून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातून व स्टीलच्या दुकानातून 1 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेली.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.