Home Latest साहित्य संमेलनाला जायचे आहे; हे घ्या बसचे वेळापत्रक

साहित्य संमेलनाला जायचे आहे; हे घ्या बसचे वेळापत्रक

0

नाशिक :- 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तमाम नागरिकांना निमंत्रण असून प्रवेश खुला आहे. त्यासाठी स्वतंत्र पास, तिकीट अथवा तत्सम बाबीची काेणती गरज असणार नाही. मात्र काेराेनाच्या अनुषंगाने शासनाने जे निर्बंध जारी केले आहेत, जसे लसीकरण झालेले असणे आणि मास्कचा वापर करणे इत्यादी याचे पालन सर्वांनी करुन सहकार्य करावे.

या संमेलनासाठी नाशिकच्या विविध ठिकाणाहून तीनही दिवस बसेसची व्यवस्था केलेली आहे. या बसेस सकाळी 8 वाजेपासून सुटणार असून त्या साधारण दर 15 मिनीटांनी उपलब्ध हाेतील. सविस्तर माहिती साेबत जाेडली आहे.

काही प्रतिनिधी संमेलन स्थळी येऊन ऐनवेळेस प्रतिनिधी शुल्क भरु शकतात. त्यांना असे शुल्क तेथे भरता येईल. बाहेर गावाहून काही प्रतिनिधींना निवासाची व भाेजनादी व्यवस्था नकाे आहे त्यांना असे प्रतिनिधी शुल्क भरावे लागणार नाही.