उपनगर येथे बर्निंग कारचा थरार

नाशिकरोड (प्रतिनिधी):- उपनगर नाक्यावर काल रात्री च्या सुमारास बर्निग कार चा प्रकार घडला.मात्र यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, शशी हरी हेमनानी (वय ३८, रा. पेस अपार्टमेंट, गोविंद नगर, नाशिक) हे वडील हरी हेमनानी व चार मुले यांच्या सोबत भगूर येथे रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी जात होते. गांधीनगर सोडल्यानंतर इच्छामनी मंगल कार्यालय, उपनगर नाका सिग्नल येथे त्याच्या पाठीमागून येणाऱ्या रिक्षा चालकाने हेमनानी यांना त्याच्या गाडीने मागच्या बाजूने पेट घेऊन जाळ व धूर येत असल्याचे सांगितले.

प्रसंगावधान राखीत हेमनानी परिवार गाडी खाली उतरले. हळूहळू गाडीने मोठया प्रमाणात पेट घेऊन अग्नीची शिकार झाली. घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर हे दाखल त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!