नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तीन न्यायबंदीचा शिक्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्या आधी आपल्या फायद्यासाठी कारागृहातून सोडून दिल्याचे लक्षात आल्याने कारागृहातील दोन अधिकारी सह एका वरिष्ठ लिपिका वर नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे,

या बाबत अधिक माहिती अशी की, २०१७ मध्ये नाशिकरोड कारागृहात कार्यरत असलेल्या तुरुंग अधिकारी श्रेणी १शामराव अश्रूबा गीते,तुरुंग अधिकारी श्रेणी २माधव कामाजी खैरगे व वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांनी कारागृहात शिक्षाबंदी असलेल्या तीन कैद्यांना त्याची शिक्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोधर आपल्या फायद्यासाठी सोडून कारागृहातून बेकायदेशीर सोडून शासनाची फसवणूक केली. ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कारागृह महासंचालक यांनी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्यात दोषी असल्याचे निष्पन्न झाल्या नंतरत्याच्या आदेशाने तुरुंग अधिकारी सतीश रामचंद्र गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तुरुंग अधिकारी श्रेणी १शामराव अश्रूबा गीते,तसेच नांदेड जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले तुरुंग अधिकारी श्रेणी २माधव कामाजी खैरगे व जालना जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांच्या विरोधात फिर्याद दिली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर एम मनतोडे करीत आहे.
या बाबत कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दुजोरा दिला आहे.
या प्रकारा मुळे खळबळ उडाली आहे.