अनधिकृत वृक्षतोड केल्याने गुन्हा दाखल; साडेसात लाखांचा दंड

शहरातील अनधिकृत वृक्षतोडबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन वेळोवेळी कारवाई केली जाते.

नवीन वर्षात मनपाच्या पश्चिम उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन विभागातील वेगवेगळया विविध आठ ठिकाणी अनधिकृत वृक्षतोडी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनद्वारे कायदेशीर कार्यवाही सुरु आहे . तसेच ७,५५,००० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. त्र्यंबक नाका येथील ओम सर्व्हिसस्टेशन पंप, मयुर गॅस एजन्सी, सर्वांगी साडी सेंटर तसेच बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्यान तसेच वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवीत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार असून शहरातील नागरीकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्या करीता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन रितसर परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे.तसे न केल्यास महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!