नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा):- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) चा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने तत्काळ पाहता येणार आहेत.
10 वीचा निकाल कसा पाहाल –
स्टेप 1: गुगल प्लेस्टोअरवरून उमंग अॅप डाउनलोड करा.
स्टेप 2: तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यावर स्वतःची नोंदणी करा.
स्टेप 3: आता सीबीएसइ निकाल टॅबवर क्लिक करा.
स्टेप 4: आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा म्हणजे: रोल नंबर, अॅडमिट कार्ड नंबर.
स्टेप 5: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल.
स्टेप 6: सर्व तपशील बरोबर आहेत का ते तपासा.

काही दिवसांआधी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली. यानंतर सीबीएसई बोर्डाच्या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. यंदा सीबीएसई नं दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म एक परीक्षा तर एप्रिल-मे महिन्यात टर्म दोन परीक्षा पार पडली होती. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती वाढू लागली होती. अखेर निकाल जाहीर झाला आहे.
सीबीएसई बोर्डाकडून टर्म 1 च्या परीक्षेच्या निकालानंतर, यावेळी निकाल एकत्रित केला जाणार आहे, म्हणजे टर्म 1 आणि टर्म 2 च्या दोन्ही परीक्षांचे निकाल त्यात समाविष्ट केले जातील. उइडए बोर्ड टर्म 2 चा निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थी अंतिम निकालातून टर्म 1 परीक्षेचा निकाल वजा करू शकतात.