नाशिक (प्रतिनिधी) :- भाजी घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सिडकोत घडली.
फिर्यादी कल्पना कौतिक आहिरे (वय 62, रा. युगमंदिर सोसायटी, सिडको ऑफिसच्या मागे, नाशिक) ही वृद्ध महिला काल रात्री 8 च्या सुमारास शिवाजी चौक भाजी मार्केटमध्ये गेली होती. भाजी घेण्यासाठी ही वृद्धा वाकली असता अज्ञात चोरट्याने या महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीचे 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने चोरून नेले.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार परदेशी करीत आहेत.
