नाशिक (प्रतिनिधी) :- दूध घेऊन येत असताना मोपेडवरून आलेल्या चोरट्याने तरुणीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र ओरबाडून पलायन केल्याची घटना सिडकोतील दत्त चौक भागात घडली.

याबाबत तेजस्विनी रोहित झोडगे (रा. अनुष्का रो-हाऊस, शिवपुरी चौकाजवळ, उत्तमनगर) यांनी अंबड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
भरदुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत हे करीत आहेत.