मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- येत्या 5 दिवसांत राज्यात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोसाट्याच्या वार्यासह वादळाचीही शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

मान्सूनने आता विदर्भाकडे वाटचाल सुरु केलीय. येत्या दोन दिवसांत मान्सून विदर्भात दाखल होण्याचा अंदाज आहे. विदर्भाच्या काही भागात सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरु आहेत. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

कोकणात मात्र आता मान्सूनचा पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. मान्सूनने सोमवारी मध्य महाराष्ट्राचा जवळपास सर्व भाग व्यापून मराठवाडयाच्या बहुतांश भागांत प्रवेश केला होता. सध्या मोसमी पावसाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मान्सूनच्या वार्यांची प्रगती चांगली असली तरी दाखल झालेल्या भागात पावसाचं प्रमाण कमी आहे. ावसामुळे दिलासा मिळाला आहे.