इंस्टाग्रामवर अनोळखी व्यक्तीशी गप्पा मारणे तरुणीला पडले महागात

अमरावती : शहरातील एका इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या तरूणीला तिच्या इंस्टाग्रामला एका अकाऊंटवरून फॉलो रिक्वेस्ट आली अन तिने ती अॅक्सेप्टही केली. या अकाऊंटच नाव ‘मिस्टर बेफीकरा’ असे होते. त्यानंतर त्या दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या, मैत्री झाली अन या गप्पा त्यांच्या मैत्रीला थेट पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेल्या.

वसतीगृहामध्ये राहून इंजिनिअरींग ला शिकणाऱ्या या मुलीला समोरच्या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल अन ही मुलगी आता आपल्यावर पक्का विश्वास ठेवायला लागलीय आहे, हे कळताच त्या मुलाने तिला न्यूड फोटो पाठवण्याची विनंती केली. मुलीने देखील कसलाच मागचा पुढचा विचार न करता त्याला फोटो पाठवले अन तिथेच तिचा घात झाला.

त्यानंतर, समोरच्या मुलाने तिला शारीरीक संबंध प्रस्थापित करण्यास तगादा लावला होता. आणि जर तसे न केल्यास तिचे सर्व न्यूड फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले जातील, अशी धमकीही दिली तिला देण्यात आली होती. मुलीने त्याला खुप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलगा तिचे काही ऐकेना शेवटी मुलीने कुटूंबियांना विश्वासात घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले आणि सायबर क्राईमला या प्रकरणी तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. पोलीसांनी ‘मिस्टर बेफीकरा’ हे अकाऊंट इंस्टाग्रामवरून ब्लॉक केले आहे.

पोलिस आयुक्त आरती सिंग यांच्या कारकीर्दीमध्ये सोशल मीडियावर अशा घटनांना आळा घालण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमरावती सिटी पोलीस या फेसबूक पेजमार्फत जनजागृतीचे काम देखील केले जाते. परंतु, नागरिकांमध्ये सोशल मीडियाबाबत अधिक मार्गदर्शनाची आता गरज आहे. या विषयावर बोलतांना पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणाल्या की, व्हेरिफाय न करता सोशल मिडियावर कुणाही अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका. समोरच्या अनोळखी व्यक्तीचे प्रोफाईल हुरळून जाऊ नका. मोहात पडून चूक करू नका. ती क्षणाची चूक तुम्हाला आयुष्यभर मनस्ताप देऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!