नाशिक (प्रतिनिधी) :– घरगुती कार्यक्रमासाठी चार लाख रुपये किमतीची साऊंड सिस्टीम भाड्याने घेऊन ती परस्पर विकून फसवणूक केली.
या प्रकरणी अमोल अरुण हिरवे (वय 39, रा. हिरवे फार्म, नवशक्ती चौक, भाभानगर) यांनी फसवणुकीसंदर्भात कोर्टात धाव घेतली असता सह न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट क्रमांक 5 या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मुंबई नाका पोलिसांनी विक्रम रतन बागूल (रा. वय 40, रा. सरोजिनी सोसायटीशेजारी, पेंढारकर कॉलनी, जेलरोड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम बागूल यांनी दि. 13 ऑक्टोबर 2020 रोजी चार लाख रुपये किमतीची साऊंड सिस्टीम घरगुती कार्यक्रमासाठी हिरवे यांच्याकडून घेतली होती; मात्र ती अद्यापही परत न करता परस्पर विकून अमोल हिरवे यांची फसवणूक केली व हिरवे हे पैसे मागण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. म्हणून भा. दं. वि. कलम 420, 406, 427, 504 अन्वये मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.