बनावट दस्तऐवज तयार करुन भावाने केली भावाचीच फसवणूक

निफाड :- बनावट दस्तऐवज करून घर स्वतःच्या नावावर केल्याप्रकरणी भावासह 9 जणांनी फसवणूक केल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सध्या ठाण्यात राहत असलेले चेतन भीमराव निरभवणे यांचे निफाड तालुक्यातील जळगाव येथे वडिलोपार्जित घर आहे. सन 2015 ते 27 नोव्हेंबर 2020 दरम्यान चेतन यांचा भाऊ चंद्रकांत व इतर 8 जणांनी संगनमत करून चेतन यांचे वडिलोपार्जित घराबाबत बनावट दस्तऐवज करून चेतनच्या वडिलांची खोटी सही करून सदर घर चंद्रकांत ने स्वतःच्या नावावर करून फसवणूक केली. अशा अर्थाच्या तक्रारीवरून निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!