एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांसोबत बंड पुकारून राज्यात भाजपासोबत नविन सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. तेव्हापासून एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांकडून सतत टीका होत आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा युक्तिवाद करत आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट केलं असून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो असून बाजूला बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन, असे लिहिले आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1547036979673542656?s=20&t=flwDZqGMRW1Ta-YCcZ9lZA