मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. सततचे अतिव्यस्त दौरे आणि पहाटे पर्यंतच्या सभांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत आहे. डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्त आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्याच्या वृत्ताला दीपक केसरकर यांनी दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सातत्याने दौरे सुरु आहेत. आतापर्यंत ते अनेकदा दिल्ली दौर्यावर गेले आहेत. तसेच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून पूरग्रस्त भागाचा राज्याचा देखील दौरा केला आहे.

सततचे अतिव्यस्त दौरे आणि पहाटेपर्यंतच्या सभांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत आहेत. यामुळं डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्त आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.