मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात त्यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात येत होते.

मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पूजा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी समर्थक आमदार, पदाधिकारी, अधिकारी यांची गर्दी झाली होती.

मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला आहे. कार्यभार स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सचिवांशी चर्चा करून खर्‍या अर्थाने आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन गतिमान पद्धतीने कारभार करण्यावर भर द्यावयास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!