नाशिकमध्ये सिटीलिंक बस “या” दोन नवीन मार्गांवरही धावणार

 

नाशिक :- नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि.अर्थातच सिटीलिंक च्या वतीने मार्ग क्रमांक ११५ व मार्ग क्रमांक ११७ असे दोन नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहे.

मार्ग क्रमांक ११५ (तपोवन ते बेळगाव ढगा मार्गे सिव्हिल सातपूर)
तपोवन ते बेळगाव ढगा – सकाळी ५.३५ वाजता.
बेळगाव ढगा ते निमाणी – सकाळी ६.३०, दुपारी १२.३५ व सायं.१७.४० वाजता.
निमाणी ते बेळगाव ढगा – सकाळी १०.३०, सायंकाळी १६.४५ वाजता.
बेळगाव ढगा ते सातपूर – सकाळी ११.३० वाजता तर
सातपूर ते बेळगाव ढगा – दुपारी १२.०० वाजता बसफेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मार्ग क्रमांक 117( तपोवन ते चुंचाळे गाव मार्गे सातपूर)
तपोवन ते चुंचाळेगाव – सकाळी ५.५० वाजता.
चुंचाळे गाव ते बारदान फाटा – सकाळी ६.४५, दुपारी १३.०० वाजता,
बारदान फाटा ते चुंचाळे गाव – दुपारी १२.०५, सायंकाळी १७.१५ वाजता, तसेच चुंचाळे ते तपोवन मार्गे सातपूर सायंकाळी १७.५५ वाजता फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याशिवाय मार्ग क्रमांक ११७ वरच बारदान फाटा ते पाथर्डी गाव – ७.३०, ९.५०, १२.०५, १३.४५ वाजता तर पाथर्डी गाव ते बारदान फाटा मार्गे गरवारे, सीमेन्स, एक्सलो पॉईंट, कदम भवन, पपया नर्सरी – ८.४०, ११.००, १५.०० वाजता बस फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!