ईपिलेप्सी आजार निदान व उपचार शिबीराचे 8 मे रोजी आयोजन

 

नाशिक :- जिल्हा शासकीय रूग्णालय येथे 8 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवसीय ईपिलेप्सी शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांना इपिलेप्सी (उपस्मार किंवा फेफरे) आजार असल्याचे दिसून आले आहे. सर्वसाधारणपणे हजारमध्ये एका मुलाला व प्रौढामध्ये एक लाख व्यक्ती मागे एक इतके प्रमाण आढळून आले आहे.

ईपिलेप्सी रूग्णांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी न्युरॉलॉजीस्ट किंवा इपिलेप्टॉलॉजिस्टकडून निदान व उपचार करण्याच्या दृष्टीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे आयोजन इपिलेप्सी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित केले असून, शिबारासाठी मुंबई येथून डॉ.निर्मल सुर्या व त्यांचे पथक रूग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!