मुंबई (भ्रमर वृत्तसेवा ) :- वाढत्या महागाईने सर्वच जण त्रस्त झाले असताना व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 136 रुपये कपात करण्यात आली आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. आता घरगुती सिलिंडरचेही दर कधी कमी होतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
नव्या दरानुसार 19 किलोग्रॅम व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल 136 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. मध्यंतरी पेट्रोल व डिझेलच्या दरात सुट मिळाली होती. त्या पाठोपाठ व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाल्यामुळे आता घरगुती सिलिंडरचे दर देखील कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दोन वेळा वाढ करण्यात आली होती.
7 मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 तर 19 मे रोजी 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज म्हणजेच 1 जून रोजी 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरवर थेट 135 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. आता 19 किलोचा सिलिंडर मुंबईत 2306 ऐवजी 2171.50 रुपयांना मिळेल.