वैभव पगार
म्हेळूस्के (वार्ताहर) : दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी येथील सरस्वती नगर मधील संदेश किशोर गुप्ता यांच्या मालकीच्या रेखान ऍग्रो या काजू प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला आज शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेत लाखोंचा कच्चामाल जळाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली.

याबाबत जानोरी चे कामगार तलाठी किरण भोये व दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड करीत आहेत.