सुप्रसिध्द अभिनेते महेश कोठारेंना पितृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन

मुंबई :  मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचे वडील ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने अंबर कोठारे यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची नातसून अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आज (दि. २१) सासऱ्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. अंबर कोठारे यांच्यावर बोरिवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश कोठारे यांच्या संपूर्ण प्रवासामध्ये वडील अंबर कोठारे यांचा मोलाचा वाटा होता. अनेक सिनेमा, नाटकात त्यांनी कामे केली आहेत.  ‘धुमधडाका’ हा त्यांनी निर्मिती केलेला सिनेमा प्रचंड गाजला होता. त्याचप्रमाणे ‘दे दणादण’ या सिनेमात देखील त्यांनी खलनायकाची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. त्यांच्या निधनाने कोठारे फॅमिली दु:खात आहे. सिनेसृष्टीमधील अनेक दिग्गज मंडळींकडून अंबर कोठारे यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

अंबर कोठारे यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. पण नोकरी करत त्यांनी त्यांच्या अभिनयाची आवडही जोपासली. प्रयोगिक रंगभूमीवर त्यांनी अनेक वर्ष कामे केली. आयएनटी म्हणजे इंडियन नॅशनल थिएटरच्या मराठी विभागाचे ते सचिव होते. या संस्थेद्वारे त्यांनी अनेक नाटके सादर केली. त्यातील ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे नाटक जास्तच गाजले होते. आज सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या अनेक कलाकारांनी त्यांच्या सुरूवातीच्या काळामध्ये या नाटकाच काम केले. या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले होते.

https://www.instagram.com/p/Cnq9Zf6MPVG/?utm_source=ig_web_copy_link

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!