ञ्यंबकेश्वर :- मागच्या रविवारी भाविक पर्यटकांच्या वाहनांची दाटी आणि वाहतुक कोंडी लक्षात घेत श्रावण महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या रविवार व सोमवार करिता शहराच्या लगत असलेल्या जागा वाहनतळांसाठी निश्चीत करण्यता आल्या आहेत.

पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मागर्दशनाखाली ञ्यंबक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदिप रणदिवे, उपनिरीक्षक अश्विनी पाटील, राणी डफळ आणि कर्मचारी यांनी जागा मालकांशी चर्चा करून पे आणि पार्क सुविधा उपलबध्द करून दिली आहे. भाविकांची वाहने सुरक्षित राहतील आणि शहरात वाहनांची दाटी होणार नाही यासाठी सर्व नियोजन आखण्यात आले आहे.

स्थानिक वाहनधारकांना रविवार सोमवार प्रवास करणे आवश्यक असेल तर त्यांना वाहन प्रवेश पास देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या सुचनेने संत गजानन महाराज पोलीस चौकी येथे वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक सदाशीव पाटील यांनी आज दिवसभर येथे वाहन पास देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. येथे पास देतांना वाहन मालकांची नोंद करून घेण्यात आली आहे.
दरम्यान ञ्यंबक पोलीसांनी जाहीर केलेल्या वाहतळ जागा खालीलप्रमाणे आहेत :
1) पंचायती निर्वाणी आखाडा प्रयाग तीर्थ शेजारी सिंहस्थ साधुग्रामच्या बाजूस
2) महावितरण सबस्टेशन समोर शासकीय रेस्ट हाऊसच्या बाजूस असलेली मोकळी जागा
3) जव्हार रस्ता रेणुका हॉलच्या मंगल कार्यालयाच्या बाजूस असलेले मैदान
4) श्रीचंद्र लॉन्स नविन बस स्थानकाच्या बाजूस असलेली मोकळी जागा
5) कैलास राजा नगर गेट, रिंग रोड स्वामी समर्थ केंद्र मार्ग
भाविक पर्यटकांची वाहने कोणत्याही कारणास्तव शहरात सोडली जाणार नसल्याचे पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांनी सांगितले आहे. भाविकांनी वरील जागांवर वाहने उभी करावीत आणि सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
दरम्यान तिस-या सोमवार करिता नाशिक ञ्यंबक रस्त्यावर खंबाळे, जव्हार मार्गे येणा-यांसाठी या रस्त्यावर अंबोली बुवाची वाडी, घोटी रस्त्यावर पहिने, त्याच प्रमाणे गिरणारे मार्गाने येणा-यांसाठी तळवाडे या ठिकाणी पार्किंगची जागा निश्चीत करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या सोमवार करिता कोणत्याही पासची सुविधा देण्यात आलेली नाही.