वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेपूर्वीच भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव; “या” खेळाडूंना झाली लागण

नवी दिल्ली :– वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांपूर्वी भारतीय क्रिकेट संघात करोनाचा शिरकाव झाला आहे.

भारतीय संघातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या खेळाडूंमध्ये स्टार फलंदाज शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड व प्रशासकीय सहाय्यक यांचा समावेश आहे. भारतीय संघ सध्या अहमदाबाद येथे सराव करत आहे. दरम्यान सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम खेळाडूंची काळजी घेत आहे.

भारत आणि विंडीज या संघांमध्ये प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकांच्या तयारीसाठी भारतीय संघ ३१ जानेवारीला अहमदाबाद येथे दाखल झाला. त्यानंतर खेळाडू तीन दिवस विलगीकरणात होते.

अहमदाबाद येथे ६ फेब्रुवारीला होणारा पहिला सामना हा भारताचा १०००वा एकदिवसीय सामना असेल. मात्र, करोनाबाधित असल्याने धवन, गायकवाड आणि श्रेयस हे पहिल्या सामन्याला मुकणार हे जवळपास निश्चित आहे. त्यांना आठवडाभर विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर दोन वेळा करोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यावर त्यांना पुन्हा संघात दाखल होता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!