नाशिक (प्रतिनिधी) -सुपरमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात नाशिक ब्लास्टर संघाने नाशिक सुपर किंगवर चार धावांनी विजय मिळवला. अन्य एका सामन्यात रसिका शिंदेने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर नाशिक फायटर संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.

दरम्यान ,उद्या शनिवारी नाशिक ब्लास्टर विरुद्ध नासिक वॉरियर्स आणि नाशिक सुपर किंग्स विरुद्ध नासिक फायटर यांच्यात लढत होणार आहे. दुपारनंतर अंतिम फेरीचा सामना होईल.
छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नवी दिल्ली , विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या t20 क्रिकेट स्पर्धा नाशिकच्या अनंत कान्हेरे खेळविण्यात येत आहे.

आज झालेल्या साखळी सामन्यात नाशिक सुपर किंग्स आणि नाशिक ब्लास्टर यांच्यात अटीतटीची लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना नाशिक सुपर किंगने निर्धारित 20 षटकात 9 बाद 96 धावा केल्या .त्याला उत्तर देताना नाशिक ब्लास्टरचा संघ अडचणीत सापडला.शाल्मली शत्रिय आणि साक्षी कानडी हे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने संघ अडचणीत आला, मात्र ईशानी वर्मा आणि गायत्री माळी यांनी संयमी फलंदाजी केल्याने अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला.
अखेरच्या चेंडूवर दोन धावा पाहिजे असताना एकच धाव निघाल्याने सामना टाय झाला. त्यानंतर सामन्याचा निकाल सुपरमध्ये लागणार हे निश्चित झाले. शाल्मली क्षत्रिय आणि साक्षी कानडी यांनी एका षटकात 15 धावा काढल्या. विजयासाठी सुपरकिंग्जचा धावांचे आव्हान देण्यात आले. मात्र त्यांना एका षटकात 11 धावा करता आल्या.
अन्य एका सामन्यात नाशिक फायटर विरुद्ध नाशिक चॅम्पियन यांच्यातील लढतदेखील अटीतटीची झाली. या सामन्यात नाशिक फायटर संघाने अवघ्या एका धावेने विजय मिळवला. नाशिक फायटर संघाने 20 षटकांत 8 बाद 134 धावा केल्या. कर्णधार रसिका शिंदेने 51 धावा केल्या. त्यात 39 चौकार आणि एक षटकार खेचला प्रिया सिंग दोन गडी बाद केले. 34 धावांचे आव्हानला उत्तर देताना नाशिक चंपियनला निर्धारित वेळेत षटके न टाकल्याने त्याचा दंड त्यांना महागात पडला आणि नाशिक चंपियनला नाशिक फायटरने एका धावेने पराभूत केले. कर्णधार प्रिया सिंगची झुंज एकाकी ठरली. तिने सात चौकारसह 51 धावा केल्या. दरम्यान आज झालेले सामने अटीतटीची ठरले यावरूनच उद्याचे उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचे सामने कसे होणार हा एक आज ट्रेलर दिसला.