नाशिक (प्रतिनिधी) :- श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नवी दिल्ली विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित महिला प्रिमियर आयोजन करण्यात आले आहे .स्पर्धेच्या पहिल्या दिवशी साखळी सामन्यात तेजस्विनी बटवाल आणि साक्षी कानडीने नाबाद शतकामुळे आजचा दिवस वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

आज सकाळी अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सामन्यात नाशिक सुपर किंगची कर्णधार तेजस्विनी बटवालने नाबाद 112 धावा केल्या दुसऱ्या एका सामन्यात नाशिक ब्लास्टरची कर्णधार साक्षी कानडीने 62 चेंडूत 20 चौकाराचया साह्याने नाबाद 119 धावा केल्या. अष्टपैलू कामगिरी करत गोलंदाजीत तिने दहा धावांमध्ये 4 गडी बाद केले.

नाशिक ब्लास्टर संघाने दोन बाद 186 केल्या.त्याला उत्तर देताना नाशिक स्टारचा संघ 20 षटकात आठ बाद 82 धावा करू शकला. नाशिक ब्लास्टर ने हा सामना 108 धावांनी सामना जिंकला.
आणखी एका सामन्यात नाशिक फायटर संघाने नाशिक वॉरियर्स 9 गडी राखून विजय मिळवला. फायटर संघाची कर्णधार रसिका शिंदेने 27 चेंडूमध्ये नाबाद 45 धावा केल्या. तिने दोन षटकार चौकार ठोकले. नाशिक फायटर संघाने सहज विजय मिळवला. सलग दोन पराभवामुळे नाशिक स्टारचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.