कोयत्याचा धाक दाखवून एकास बळजबरीने लुटला

नाशिक (प्रतिनिधी) :- कोयत्याचा धाक दाखवून युवकाच्या खिशातून दहा हजार रुपये, मोबाईल, सोन्याची चेन व अंगठी असा सुमारे 62 हजारांचा ऐवज बळजबरीने लुटून नेणार्‍या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यासीन मोहंमद सय्यद (वय 23, रा. वरची गल्ली, देवळाली गाव) याला काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सॅण्डी वेफर्सच्या बाजूकडील रस्त्यावर आरोपी किरण लवटे, दानिश शेख व त्यांचे इतर चार साथीदार (सर्व रा. देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी सय्यद याला अडविले. त्याला कोयत्याचा धाक दाखवून सय्यद याच्या खिशातील दहा हजार रुपये रोख, 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, आठ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व चार हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे 62 हजारांचा ऐवज मारहाण व दुखापत करून बळजबरीने लुटून नेला.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!