बँकेच्या वसुली एजंटकडून पंचवटीत कर्जदारास मारहाण

नाशिक (प्रतिनिधी) :- एच. डी. एफ. सी. बँकेच्या कर्जवसुली एजंटने कर्जदारास मारहाण केल्याची घटना तारवालानगर येथे घडली.

याबाबत दीपक भास्कर अग्रहारकर (वय 40, रा. नंदादीप रो-हाऊस, शिवनगर, तारवालानगर) यांनी फिर्याद दिली ैआहे. त्यात म्हटले आहे, की दि. 29 मे रोजी रात्री 8 वाजता तारवालानगर येथील घरासमोर एक अनोळखी इसम आला. त्याने त्याचे नाव अजय जाधव असल्याचे सांगितले. “मी एच. डी. एफ. सी. बँकेच्या वसुलीचे काम करतो. तुमच्याकडे बँकेचे 80 हजार रुपये बाकी आहेत.

ते भरून टाका,” असे त्याने सांगितले. तेव्हा अग्रहारकर यांनी त्याच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली असता वसुली एजंटला त्याचा राग आला. त्याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तेथे पडलेली वीट उचलून फिर्यादीच्या दिशेने फेकून मारली. त्यात त्यांच्या हाताच्या खांद्याचे हाड मोडले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वसुली एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!