क्रेडीट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून युवकाची अडीच लाखांची फसवणूक

नाशिक :– क्रेडिट कार्ड वरील रिवॉर्ड पॉईंट वाढवून देतो असे सांगून एका युवकाला अडीच लाखांना फसविल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

भूषण प्रकाश बोरोले (वय 38) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 18 मे रोजी दुपारी बोरोले यांना 7247304766 व 8604195555 या क्रमांकावरून फोन आला होता. आपण ऍक्सिस बँक मधून बोलत असल्याचे समोरच्याने भासवले.

तो बोरोले यांना म्हणाला की, मी ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत आहे. तुमच्या क्रेडिट कार्ड मध्ये असलेले रिवॉर्ड पॉईंट वाढवून देतो असे सांगून बोरोले यांचा विश्वास संपादित केला. त्याने बोलण्याच्या नादात बोरोले यांना क्रेडिट कार्डचा नंबर, cvv व ओटीपी सांगण्यास भाग पाडले आणि त्यांच्या कार्डमधून 2,47,999 रुपयांचा व्यवहार करत बोरोले यांची फसवणूक केली.

याप्रकरणी फोन करणाऱ्या इसमाविरुद्ध व पैसे वर्ग झालेल्या खातेधारकाविरुद्ध भा. दं. वि. कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) (ड) प्रमाणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!