नाशिक (प्रतिनिधी) :- फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही दि. 9 डिसेंबर 2012 ते दि. 26 जुलै 2022 यादरम्यान सासरी नांदत होती. पतीसह सासरच्या इतर तिघांनी संगनमत करून विवाहितेला कौटुंबिक कारणावरून त्रास दिला. नाशिकमध्ये फ्लॅट विकत घेण्याकरिता माहेरून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी विवाहितेकडे वेळोवेळी केली; मात्र विवाहितेने ते पैसे आणले नाहीत म्हणून पती व सासरच्या इतरांनी तिला शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली, तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

वारंवार होणार्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात छळवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करीत आहेत.