नाशिक (प्रतिनिधी) :- जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस आयुक्तालय व नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने उद्या (दि.26) सकाळी 10 किलोमीटर जनजागृती सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीला सकाळी 5.45 वाजता सुरुवात होणार असून या रॅलीत सहभागी सायकलप्रेमी नागरिकांनी अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे जमायचे आहे. अनंत कान्हेरे मैदान येथून रॅलीला सुरुवात होऊन ही रॅली मायको सर्कल, चांडक सर्कल, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सी.बी.एस. अशोक स्तंभ, पोलीस आयुक्तालय, जुना गंगापुर नाका, कॅनडा कॉर्नर, शरणपूर पोलीस चौकी, मायको सर्कल, वीर सावरकर जलतरण तलाव मार्गे अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) ग्राउंड येथे रॅलीचा समारोप होईल.
रॅलीत सहभागी होणार्या प्रत्येक सायकलिस्टसला मेडल प्रदान करण्यात येईल व ई -सर्टिफ़िकेट देण्यात येणार आहे. तसेच लकी ड्रॉ द्वारे पाच सायकलीस्टना सायकल हेल्मेट देण्यात येईल.
तरी या सामाजिक उपक्रमात जास्तीतजास्त सायकलिस्टसने सहभागी होण्याचे आवाहन नाशिक पोलीस आयुक्तालय व नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. राईडमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा राईड विषयी अधिक माहितीसाठी डॉ. मनीषा रौंदळ मो. 9822538166 यांच्याशी संपर्क साधावा.