नाशिक :- नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशन, मानवता कॅन्सर सेंटर व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (दि. 3) रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी सायकलचा वापर करावा तसेच 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने तंबाखू सेवन हानिकारक आहे याबद्दल जनजागृती केली जाणार आहे. सायकलोथॉनला सकाळी 06:30 वाजता सुरुवात होणार असून गोदा पार्क, रामवाडी पुलाजवळ सर्वांनी जमायचे आहे.
रामवाडी गोदा पार्क (स्मार्ट सिटी प्रकल्प) येथे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, मानवता कॅन्सर सेंटरचे डॉ. राज नगरकर व नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ होईल.
या राईडमध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलिंस्टसला नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने मोबाईल स्टँड, सायकलचा मागचा लाईट (बॅक लाईट) व प्रमाणपत्र देण्यात येईल. राईड ची सांगता मानवता कॅन्सर सेंटर येथे होईल.
नाशिकचे प्रख्यात कॅन्सर सर्जन डॉ. राज नगरकर संबोधित करतील. प्रत्येकास कँप भेट देण्यात येईल व राईड ची सांगता नाष्टाने होईल. अधिक माहितीसाठी राईड कॉर्डिनेटर डॉ. मनिषा रौंदळ यांच्याशी 9822538166 या क्रमांकावर संपर्क साधावा.
“असा”आहे रॅलीचा मार्ग
गोदा पार्क (स्मार्ट सिटी) रामवाडी पुलाजवळ- रामवाडी पूल , सिद्धेश्वर मंदिर- अशोक स्तंभ-जुना गंगापूर नाका-पंडित कॉलनी- राजीव गांधी भवन- सीबीएस – गडकरी चौक-मुंबई नाका – मानवता कॅन्सर सेंटर.