नाशिक (प्रतिनिधी) :- उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील मूर्तीचे संवर्धन व देखभाल कामकाजासाठी पुढील दि. 21 जुलैपासून 45 दिवस सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी दिली.
दि. 21 जुलैपासून पुढील 45 दिवस श्री भगवती मंदिर भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी संपूर्णत: बंद राहणार आहे. मात्र विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालय नजीक भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे.
तसेच भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्तनिवास व इतर अनुषंगीक सुविधा व सातत्यपूर्वक कार्यरत असणार आहेत.