नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या इंट्रानेझल बूस्टर डोसच्या चाचण्यांसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे.

भारत बायोटेकने म्हटले आहे की, नाकातून देण्यात येणारी लस कोविड-19 चे संक्रमण रोखण्यासाठी खूप प्रभावी आहे. तिसऱ्या डोसच्या फेज III चाचणीसाठी अर्ज सादर करणारी भारत बायोटेक ही दुसरी कंपनी आहे. इंट्रानेसल लसींमध्ये, ओमिक्रॉनसह विविध COVID-19 प्रकारांचे संक्रमण रोखण्याची क्षमता आहे.

या इंट्रानेसल लसीचा डोस कोरोनाविरुद्ध लढतीसाठी उपयुक्त ठरेल. नाकातून देण्यात येणाऱ्या या कोरोना लसीची देशात नऊ ठिकाणी चाचणी केली जाणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या फेज 1 आणि फेज 2 चाचण्यांमध्ये एकूण 400 आणि 650 व्यक्तींनी भाग घेतला होता.
भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ कृष्णा एला यांनी याआधी सांगितले होते की, नाकातील लसीच्या एका डोसने संसर्ग रोखला जाऊ शकतो ज्यामुळे संक्रमण साखळी देखील अवरोधित केली जाऊ शकते. “पोलिओ सारखे फक्त 4 थेंब, एका नाकपुडीत 2 आणि दुसर्या नाकपुडीत 2. आता WHO सारख्या जागतिक अधिकाऱ्यांना दुस-या पिढीची लस म्हणून अनुनासिकाबद्दल खात्री पटली आहे,