देवगाव शिवारात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

 

लासलगाव:- मौजे देवगाव कानळद रस्त्यालगत देवगाव शिवारात आज दुपारी १२.३० च्या दरम्यान येथील शेतकरी राजेंद्र रंगनाथ बोचरे यांना दुपारी १२.३० च्या सुमारास एम.एच.१५ इ.सी.४४३६ क्रमांकाची हिरोहोंडा मोटारसायकल उभी आढळली. त्यांनी नजीक जाऊन बघितले असता त्यांना शेतात मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत पोलीस पाटील सुनील बोचरे यांना कळविले.

त्यांनी याबाबत लासलगाव पोलीस स्टेशनला खबर दिली असता अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपअधीक्षक सोमनाथ तांबे, लासलगावचे स.पो.नी राहुल वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता त्यांना गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अधिक चौकशीअंती तो मृतदेह अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक वय अंदाजे ५४ राहणार मंजूर हंडेवाडी फाटा यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे पाय बांधलेल्या अवस्थेत होते. आज सकाळी ते निफाडहुन कानळदकडे येत असताना त्यांच्याकडे १२ लाख रुपयांची रक्कम असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी व परिसराची श्वान पथकाने तपासणी केली असून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे व स.पो.नी.राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे, पो.उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पो.नाईक संदीप शिंदे, पो.नाईक औदुंबर मुरडनर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!