नाशिक :- ताज ग्रुप आणि दिपक बिल्डर्स यांच्या भागीदारीतून नाशिक शहरात लवकर ताज ग्रुपच्या “विवांता” या भव्य स्टार हॉटेलचा नविन प्रकल्प साकार होणार आहे. नाशिकच्या औद्योगिक कॉर्पोरेट जगतासाठी ही आनंदाची बाब आहे.

ताज ग्रुपची आय.एच.सी.एल. कंपनी आणि दिपक बिल्डर्स यांच्यात आज सहकार्य करार झाला. या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत दिपक बिल्डर्सचे संस्थापक दिपक चंदे आणि आयएचसीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ पुनित चटवाल यांच्यात हा करार झाला.
ओझर विमानतळापासून 15 कि.मी. अंतर असलेल्या नाशिकच्या द्वारका सर्कलजवळ विवांता या अलिशान स्टार हॉटेलचा भव्य प्रकल्प वर्षभरातच साकार होतो आहे. या हॉटेलमध्ये इनडोअर व आऊट डोअर मिळून नाशिक शहरातील सर्वात मोठी अशी सुमारे 30 हजार स्क्वेर. मीटरची बँक्वेेट स्पेस असेल. या ठिकाणी अलिशान भव्य सोशल समारंभ आयोजित करता येऊ शकतील.
नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात गेल्या 33 वर्षांपासून दिपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कार्यरत असून आजपर्यंत शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सर्वोत्तम असे अनेक भव्य गृहप्रकल्प व व्यापारी संकुले निर्माण केली आहेत. आजपर्यंत प्रकल्पातून 14 लाख स्क्वेअर फुटांचे कन्स्ट्रक्शन केले असून आगामी काळात 32 लाख स्क्वेअर फुटांचे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. शब्दाला जागणाऱ्या आणि प्रामाणिक कष्टांवर प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या दिपक बिल्डर्सने नुकतेच इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही पदार्पण केले असून राष्ट्र निर्माणासाठी दळणवळण क्षेत्रातील महामार्ग, फ्लायओव्हर्स, बोगदे यातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प भविष्यात पार पाडण्याचा मानस त्यांचा आहे. हॉटेल हॉस्पिटॅलिटी सेवा क्षेत्रातही दिपक बिल्डर्स कार्यरत आहेतच.
टाटा ग्रुपचे भारतात शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे व मौलिक योगदान आहे. यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकार करण्याची संधी दिपक बिल्डर्सला मिळणार आहे. वेगाने विकसित होत असलेल्या नाशिक शहराच्या सौंदर्यात, नावलौकिकात व प्रगतीत यामुळे भर पडणार आहे.
मुंबईत नुकत्याच झालेल्या या बिझनेस मिटींगमध्ये दिपक बिल्डर्सचे संस्थापक दिपक चंदे, आय.एस.सी.एल. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ पुनीत चट्टवाल, एक्झीक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट सुमा वेंकटेश, व्ही.पी. अर्चना राम, रिअल इस्टेट अॅवण्ड डेव्हलपमेंटचे व्ही.पी. लेह टाटा, लिगल व्ही.पी. सिंथिया नरोन्हा, पृस्नी दाश, टेक्नीकल सर्व्हिसचे व्ही.पी. प्रेम ठाकूर उपस्थित होते.
अशा असतील हॉटेलच्या सुविधा
- अडीच एकरावरील प्रशस्त जागा
- 144 लक्झरियस रुम्स
- ऑल डे डायनिंग रेस्टॉरंट
- स्पेशालिटी रेस्टॉरंट
- बार
- इन्फिनिटी पूल
- कॅफे
- सहा प्रशस्त बँक्वे्ट हॉल
- रुफ टॉप डिनर
- अत्याधुनिक सुसज्ज मिटींग स्पेस मनोरंजनासाठी गेमिंग झोन