नाशिक :- दिपक बिल्डर्स ग्रुप बांधकाम क्षेत्रात वेगळा ठसा उमटवून यशस्वी वाटचाल सुरू ठेवत विस्ताराच्या नवीन योजना अंमलात आणत आहे. रिअल इस्टेट बरोबरच इन्फ्रास्ट्रक्चर, फार्मास्युटीकल, अॅग्रो अॅण्ड फुड प्रोसेसिंग या क्षेत्रातही कार्यरत असून नुकतेच स्टार हॉटेल विवांताच्या निमित्ताने हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता शैक्षणिक क्षेत्रातही ते पदार्पण करीत आहेत.
नाशिकच्या तरुणांना कला, क्रिडा व शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर संधी निर्माण करून देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल. चत्रभुज नरसी स्कूल (सीएनएस) या शैक्षणिक संस्थेचे मुख्य विश्वस्त, शिक्षणतज्ञ तसेच अग्रगण्य खेळाडू असलेले सुजय जयराज आणि दिपक बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्सचे संस्थापक दिपक चंदे यांच्यात नुकताच या बाबतीत सहकार्य करार झाला.
अत्याधुनिक इंटरनॅशनल स्कूल असा नावलौकिक व अनेक राष्ट्रीय पुरस्कारांबरोबच पंतप्रधान नरेंद्र मोंदींकडून प्रशंसा मिळवलेल्या चत्रभुज नरसी स्कूल (सीएनएस) च्या मुंबई आणि पुणे कॅम्पससह शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी उपक्रम राबविल्यानंतर, जुहू मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल आणि कांदिवली आणि पुणे येथे चत्रभुज नरसी स्कूल (सीएनएस) चालवणारे चत्रभुज नरसी कुटुंब आता दीपक बिल्डर्ससह नाशिक येथे कॅम्पस सुरू करीत आहेत.
नाशिकच्या पाथर्डी येथे 16 एकराच्या विस्तीर्ण जागेत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा असलेले भव्य इंटरनॅशनल स्कूल व उच्च कौशल्य आधारित विद्यापीठाचे लवकरच निर्माण होणार आहे. आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीच्या स्टँडर्सचा अभ्यासक्रम, जागतिक दर्जाच्या क्रिडा सुविधा व अत्याधुनिक पायाभूत सुविधा या सर्व बाबी नाशिकच्या तरुणांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर सर्वोत्तम संधी उपलब्ध करुन देण्यास कारणीभूत ठरणार आहे.
यात सर्व क्लासरुम स्मार्ट अध्यापन साधनांनी सुसज्ज असतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा असतील. तसेच डान्स व म्युझिक स्टुडिओ असतील. नाशिकमध्ये अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, बुद्धिबळ, फुटबॉल, क्रिकेट आणि स्विमिंग यासाठी सर्वांत जास्त क्रिडा सुविधा येथे असतील. क्रीडा अकादमीला भारतातील आघाडीच्या राष्ट्रीय आणि क्रीडा चॅम्पियन्सकडून मार्गदर्शन केले जाईल. इतर पायाभूत सुविधांमध्ये ऑडिटोरियम, कॅन्टीन आणि काम करणार्या पालकांच्या मुलांसाठी डे-केअर सुविधा समाविष्ट आहे.
लहान मुले सकाळी नियमित प्रीस्कूल सत्रांना उपस्थित राहू शकतील आणि नंतर डे-केअर सुविधेच्या सुरक्षित वातावरणात राहू शकतील. विस्तीर्ण नयनरम्य परिसर, स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड एज्युकेशन, आधुनिक काळात सर्वांगिण विकासासाठी लागणार्या सर्व शैक्षणिक गरजांची पूर्तता येथे होणार असून यामुळे मुलांना शिक्षणाचा आनंद खर्या अर्थाने घेता येणार आहे.
भविष्यात करिअरच्या सोनेरी संधी आत्मसात करण्यासाठी ती सक्षम बनतील. 2023-2024 च्या शैक्षणिक वर्षासाठी जून 2023 पासून प्रवेश सुरू होतील. व्यवस्थापन, कायदा, वाणिज्य, अर्थशास्त्र, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिझाइन, ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, आर्किटेक्चर, कला अशा विविध क्षेत्रांतील करिअरसाठी हे विद्यापीठ एक सर्वसमावेशक शैक्षणिक व्यासपीठ असेल.