स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महापालिकेकडून शहरातील अशोक स्तंभ आणि भवतालच्या जागेचे सुशोभिकरण केलं जात आहे.

महापालिकेचं सदर काम अंतीम टप्प्यात आहे. सीएसआर फंडातून हे काम केलं जात आहे. सुमारे 15 लाख रुपये खर्च करुन सुशोभिकरण केलं जात आहे. 15 ऑगस्टपूर्वी संपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे.

अशोक स्तंभ चौकाचं रुपडं पालटणार असल्यानं शहरवासीयांनीही आनंद व्यक्त केला आहे. या कामामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नाशिकमधील दीपक बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सचे संचालक दिपक चंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून या कामासाठी मदत केली आहे. पुढील 10 वर्षांसाठी त्यांनी अशोक स्तंभाच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी स्विकारली आहे.

या कामाचं डिझाईन आर्किटेक्ट विशाल घोटेकर यांनी केलं आहे. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव या कल्पनेवर सुशोभिकरण साकारण्यात येत आहे. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्णत्वास येत आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मा. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महापालिकेकडून शहरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.