एकनाथ शिंदे गटातील आ.केसरकर ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाले, आम्ही…

गुवाहाटी : बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, “आम्ही कोणीही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच आहोत. उद्धव ठाकरे आमचे ऐकतील असा आम्हाला विश्वास आहे. एकनाथ शिंदेंना नेते म्हणून उद्धव साहेबांनीच केले आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंप सुरु आहे. बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेच्या गोटात दाखल होत शिवसेनेलाच आव्हान दिले आहे. या सर्व बंडानंतर पहिल्यांदाच त्यांच्या गोटातील आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत घेत एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडली.

दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
-विधिमंडळात आम्हीच शिवसेना आहोत.
-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली होती.
-विधिमंडळात बहुमत सिद्ध करुन दाखवू.
-आम्ही नोटीशीला कायदेशीर उत्तर देऊ.
-बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडणारे आम्ही एकत्र आलो आहोत.
-एकनाथ शिंदे हेच आमच्या गटाचे नेते.
-बाळासाहेबांचं नाव वापरण्याबाबत काहीही मत झालेले नाही.
-शिवसैनिकांनी तोडफोड करु नये, त्यांनी कायद्याचे पालन करावं.
-उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचे कर्तव्य पूर्ण करावे.
-महाराष्ट्रात येणे सध्या सुरक्षित वाटत नसल्याने राजकीय परिस्थिती पूर्ववत झाल्यावर महाराष्ट्रात येऊ.
-कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये.
-ठाकरेंशी आम्ही चर्चा केली, पण काही उत्तर मिळाले नाही.

तसेच शिवसेनेने निवडलेल्या नेत्यांविरोधात आम्ही कोर्टात जाणार”, असा इशारा दीपक केसरकरांनी यावेळेस दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!