नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा):- मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आज दुसर्यांदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. सोनिया गांधींच्या या चौकशीमुळे काँग्रेसमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत.

या दरम्यान राहुल गांधीही दिल्लीतील विजय चौकात निदर्शने करणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सामील झाले होते, त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी यांना किंग्सवे कॅम्पमध्ये नेण्यात आले आहे.